Homeनगर शहरमहापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी गणेश कवडे यांची बिनविरोध निवड

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी गणेश कवडे यांची बिनविरोध निवड

अहमदनगर,दि.३ मार्च,(प्रतिनिधी) – महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे (ठाकरे गट) नगरसेवक गणेश कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि 2) सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक विनीत पाऊलबुधे यांना महापौर रोहिणी शेंडगे यांनी सभागृह नेतेपदी निवड करत असल्याचे पत्र दिले. या निवडीनंतर सेना-राष्ट्रवादीतील अंतर्गत तडजोडीनुसार महापौर शेंडगे यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक विनीत पाऊलबुधे यांना सभागृहनेते पदाचे पत्र दिले.

स्थायी समिती सभापती पदासाठी कवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने छाननी नंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी कवडे यांची निवड बिनविरोध होत असल्याची घोषणा केली. यावेळी स्थायी समितीचे सदस्य विनीत पाऊलबुधे, नजीर शेख, सुनील त्र्यंबके, प्रदीप परदेशी, पल्लवी जाधव, संपत बारस्कर, मंगल लोखंडे यांच्यासह मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, नगर सचिव एस.बी तडवी आदी उपस्थित होते. तसेच यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!