Homeनगर शहरसरगम प्रेमी मित्र मंडळ व स्नेह ७५च्या गणेश कवडे आणि राजेंद्र काळे...

सरगम प्रेमी मित्र मंडळ व स्नेह ७५च्या गणेश कवडे आणि राजेंद्र काळे यांचा सत्कार संपन्न

अहमदनगर,दि.६ मार्च,(प्रतिनिधी) – मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी गणेश कवडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच सी.ए असोसिएशनच्या अध्यक्षपदी सी. ए राजेंद्र काळे यांची निवड झाल्याबद्दल सरगमप्रेमी मित्र मंडळ व स्नेह ७५च्या वतीने यांचा नुकताच एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देताना कवडे म्हणाले की, मला आणि माझ्या कुटुंबियांना सांगितीक कलेचा आणि भजनी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे तसेच मला देखील गीत गायनाची आवड आहे. जुन्या हिंदी चित्रपट गीते गाणे मला प्रचंड आवडते. सरगमप्रेमी मित्र मंडळाचे काम मी माझ्या उमेदीच्या काळापासून पाहत आलेलो असून मी देखील सभासद या नात्याने या नगरचे सांस्कृतिक वैभव समृद्ध करण्यासाठी झटणाऱ्या सरगम प्रेमी मित्र मंडळात सहभागी होऊ इच्छितो.
तसेच नगरमध्ये एखादे छोटेखानी सभागृह आणि नगर मार्गे जाणाऱ्या प्रवासी कलाकारांची राहण्या जेवणाची तसेच रियाजाची व्यवस्था व्हावी. यासाठी सरगम प्रेमी मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी मांडलेली सरगम भवन ची संकल्पना खूपच स्वागतार्ह असून त्यासाठी आपण सर्व योगदान देऊ असे आश्वासन शिवसेना नगरसेवक आणि अहमदनगर महानगपालिका स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती गणेश कवडे यांनी दिले आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोत्तम क्षीरसागर हे होते. हॉटेल स्वीट होम येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सरगम प्रेमीचे अध्यक्ष राम शिंदे, नियोजित सरगम भवन प्रकल्पाचे प्रमुख धनेश बोगावत, सरगमच्या कार्यकारिणी सदस्य अर्पणा बालटे, मनीष बोरा, विश्वनाथ पोंदे, मकरंद घोडके, पवन नाईक, अरुण आहेर, नितीन थाडे आदी उपस्थित होते. 

यावेळी सरगमप्रेमी मित्र मंडळ व स्नेह ७५च्या वतीने शाल व पुष्प गुच्छ देऊन तसेच पाहुण्यांना पुणेरी पगडीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाने त्यांच्यासमोर आपल्या समस्याही मांडल्या. त्यावेळी तुमचा हक्काचा माणूस इथे सभापती झालेला आहे. मी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. तसेच नगरचे खराब झालेले रस्ते मार्चपर्यंत डांबराने गुळगुळीत होतील असे आश्वासन ही गणेश कवडे यांनी दिले. सी. ए राजेंद्र काळे, यांनी सी.ए.असोसिएशन च्या कार्या विषयी माहिती दिली. आणि नगरसाठी उत्तम कार्य करत राहील असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!