Homeनगर शहरआनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोफत कान, नाक, घसा तपासणी

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोफत कान, नाक, घसा तपासणी

अहमदनगर,दि.२३ मार्च,(प्रतिनिधी) – व्याधीने त्रासलेल्या पीडितांच्या वेदना दूर करण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे. कृतार्थ व सेवाभावाने आयोग्यसेवेचे कार्य सुरू असून, सर्वसामान्यांना अद्यावत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सातत्याने भर पडत आहे. यासाठी मिळणारे सर्वांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी केले.  
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 31 व्या स्मृतिदिनानिमित्त स्व.सौ. शकुंतला सुवालालजी बोथरा स्मृतीप्रित्यर्थ बोथरा परिवाराच्या वतीने आयोजित कान, नाक, घसा मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आगरकर बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, उपाध्यक्ष सचिन पारखी, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, भाजपचे सरचिटणीस किशोर बोरा, तुषार पोटे, सुवालाल बोथरा, विनोदलाल बोथरा, प्रमोद बोथरा, अमोद बोथरा, सुबोध बोथरा, आशुतोष बोथरा, सतीश लोढा, मोहक बोथरा, वृषभ बोथरा, श्रेयस बोथरा, निखील बोथरा, सुंदाशू बोथरा, कविता बोथरा, कल्पना बोथरा, वैशाली बोथरा, रविना बोथरा, महिमा बोथरा, वृषिका बोथरा, दिनेश भाटीया, अमित आंत्रोदा, अतुल डागा, डॉ. सुकेशिनी गाडेकर, डॉ. अझर शेख आदी उपस्थित होते.

आशिष भंडारी यांनी प्रास्ताविकात शिबिराची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत करुन संतोष बोथरा म्हणाले की, गरजूंना जीवन देण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु आहे. सर्वसामान्य वर्गाने देखील हॉस्पिटलवर मोठा विश्‍वास टाकला आहे. सद्भावनेने आरोग्य सेवेचे मोठे कार्य उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. वसंत कटारिया यांनी महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आधार देऊन अल्पदरात आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य सुरु आहे. इतर हॉस्पिटलच्या तुलनेत नाममात्र दरात रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. रविनाताई बोथरा यांनी जीवनात निरोगी आरोग्याची गरज सांगून, या सेवेत बोथरा परिवाराला सेवेसाठी मिळालेल्या संधीचे त्यांनी आभार मानले.
तुषार पोटे यांनी मारवाडी समाज दानशूर असून, मोठ्या दातृत्वाने त्यांचे समाजात योगदान सुरु असल्याचे स्पष्ट केले. वसंत लोढा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य मंदिरात निस्वार्थ भावनेने सेवा सुरु आहे. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्याने हॉस्पिटलच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य राहणार असून, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजूंना मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
महेंद्र (भैय्या) गंधे म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल मानवसेवेचे व सामाजिक दातृत्वाचे मंदिर आहे. दीन-दुबळ्यांना येथे आरोग्य सेवा मिळत असून, आनंदऋषीची महाराजांच्या विचाराने मानवरुपी ईश्‍वरसेवा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. या शिबिरात 112 रुग्णांची कान, नाक, घसाच्या व्याधींवर मोफत तपासणी करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!