पाकिस्तान, 9 मे २०२३ – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली आहे. त्यांना पाकिस्तानी रेंजर्स म्हणजेच निमलष्करी दलाने अटक केली आहे. इम्रान खान 2 प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात पोहोचले होते.
एका प्रत्यक्षदर्शीने पाकिस्तानचे वृत्तपत्र द डॉनला सांगितले की, इम्रान खान उच्च न्यायालयात दाखल होताच निमलष्करी दल आणि सशस्त्र पथकेही उच्च न्यायालयात दाखल झाली. दार चिलखती वाहनांनी अडवण्यात आले आणि काही वेळातच इम्रान यांना पकडून बाहेर आणण्यात आले.
अलीकडेच इम्रान खान यांनी इंटेलिजन्सच्या उच्च अधिकार्यांवर आरोप केला होता की त्यांनी वजिराबादमध्ये आपल्याला ठार मारण्याचा कट रचला होता. पाकिस्तानी लष्कराने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर इम्रान यांनी आज एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोपांची पुनरावृत्ती केली. याच्या 4 तासांनंतर त्यांना न्यायालयातून अटक करण्यात आली.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टातून अटक
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on