मुंबई, २० जानेवारी २०२३ –
माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. सावंत यांच्या कारला डंपरने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दीपक सावंत गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकने अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.