Homeनगर शहरप्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हा नेत्र शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. रासकर यांचा...

प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हा नेत्र शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. रासकर यांचा सत्कार

अहमदनगर,दि.४ मे,(प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाच्या जिल्हा नेत्र शल्यचिकित्सकपदी डॉ. संतोश रासकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे व शहराध्यक्ष संदेश रपारिया यांनी डॉ. रासकर यांचा सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयातील डॉ. मनोज घुगे, डॉ. श्रीकांत पाठक, डॉ. अरुण सोनवणे, प्रशासकीय अधिकारी योगेश गायकवाड, चिकित्सा अधिकारी डॉ. दिवटे, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. एस.डी. अडे, डॉ. संतोष चौधरी, डॉ. विवेक दिक्षीत, डॉ. साजिद तांबोली, डॉ. अजीता गरुड, सतीश आहिरे, प्रहारच्या महिला शहराध्यक्षा सरला मोहळकर, जिल्हा सचिव हमिद शेख, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे, अरविंद नरसाळे, कांचन रपारिया, नंदा शिंदे, गीतांजली कासार आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, दिव्यांगांसाठी डॉ. संतोश रासकर यांचे नेहमीच सहकार्य असते. दिव्यांगांचे अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असून, जिल्हा रुग्णालय प्रशासनाची देखील सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना डॉ. संतोश रासकर यांनी बुधवारी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी येत असतात. अनेक दिव्यांगांना नेत्राचे देखील समस्या असून, बुधवारी येणार्‍या दिव्यागांना नेत्र तपासणीसाठी राखीव वेळ ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी डॉ. रासकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!