Homeनगर जिल्हाचायना मांजाने कापला पाच वर्षीय मुलीचा गळा

चायना मांजाने कापला पाच वर्षीय मुलीचा गळा

राहुरी,दि.१३ जानेवारी,(प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे स्वरा चाकणे ही पाच वर्षीय मुलगी तीच्या वडिलांसोबत मोटरसायकलवर जात असताना तिचा चायना मांजाने गळा कापून ती गंभीररित्या जखमी झाल्याची घटना १० जानेवारी रोजी घडली आहे. चायना मांजामुळे सदर मुलीला गंभीर दुखापत झाली आहे

गोविंद वसंत चाकने हे राहुरी तालूक्यातील वांबोरी येथील रहिवाशी आहेत. त्यांची पाच वर्षीय मुलगी स्वरा गोविंद चाकने ही मुलगी राहुरी शहरातील त्यांचे नातेवाईक संजय गुलदगड यांच्याकडे आली होती. दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान स्वरा व तीचे वडील मोटरसायकलवर वांबोरी येथे जात होते. दरम्यान राहुरी खुर्द येथेच माऊलाई मंदिरा समोर रस्त्याने जात असताना चायना मांजा स्वरा हिच्या गळ्याला अडकून कापला गेला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!