Homeनगर जिल्हाअहमदनगरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; दोन कामगारांचा मृत्यू

अहमदनगरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; दोन कामगारांचा मृत्यू

अहमदनगर, १३ मे २०२३ – अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जामखेड तालुक्यात फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन आग लागली आहे. या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. तापमानाचा पारा चाळीशी पार असताना शनिवारी (१३ मे) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

आगीची माहिती मिळताच, अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. हा स्फोट इतका भयानक होता. की स्फोटामुळे कंपनीच्या भिंतीला भगदाड पडले आहे. स्फोटामध्ये जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

या दुर्घटनेत ज्ञानेश्वर चंद्रकात भोडवे (वय ४५ रा. घोडेगाव.ता.जामखेड) व झहीर सत्तार मुलानी (वय ३५ रा. तेरखेडा. ता कळंब) यांचा मृत्यू झाला. तर कारखान्याच्या बाजूला थांबलेले दोघे जखमी झाले आहे. जामखेड शहरातील नगररोडवर पंकज शेळके यांच्या मालकीचा रेडमॅटीक ऑटोमॅटीक फायर फायटर हा कारखाना आहे.

शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास या कारखान्यात कामगार ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व झहीर सत्तार मुलानी हे दोघे काम करीत होते. तर इतर दोघे कारखान्याच्या बाजुला थांबलेले होते. त्यावेळी अचानक कारखान्यात स्फोट झाला.

त्यातून धुराचे मोठे लोट बाहेर आले. स्फोटाच्या आवाजाने आजुबाजूचे लोक धावत बाहेर आले. मात्र धुराचे लोट प्रचंड होते शिवाय आतमध्ये अधुनमधुन स्फोटांचे आवाज येत होते. त्यामुळे जवळ जाता येत नव्हते. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यांचे पथक तातडीने आले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने बचावकार्य व मदत कार्य सुरू केले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आली. त्यानंतर आतमध्ये जाऊन पाहिले असता दोन कामगार होरपळलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!