अहमदनगर,दि.७ मार्च,(प्रतिनिधी) – एखाद्या चित्रपटामध्ये पाहिलेल्या हिरोला रस्त्यावर सहजासहजी भेटता येईल, आणि तो हिरो स्वतःहून आपल्याशी बोलेल, असा विचार स्वप्नातही सामान्य माणूस करणार नाही. परंतु स्वप्नवत वाटणारी ही घटना अहमदनगर येथील एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडली आहे. गावाकडील कच्चा रस्त्याने बैलगाडीने जात असलेल्या एका शेतकऱ्याला रस्त्यावर चक्क अभिनेता सनी देवल भेटले. आपल्याला भेटलेली व्यक्ती ही सनी देवल आहे, यावर विश्वास न बसल्याने शेतकऱ्यांनी न राहून, ‘तुम्ही तर सनी देवल सारखेच दिसता, असे सनी देवल यांना सांगितलं. त्यावर नेमकं आता या शेतकऱ्याला काय उत्तर द्यावं? हे सनी देवल यांनाही लवकर सुचलं नाही. या सर्व प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सनी देवल त्यांची पुढील फिल्म ‘गदर 2’ च्या शूटिंगसाठी अहमदनगर येथे आहे. जिल्ह्यातील एका गावात सकाळी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळेस त्यांची भेट रस्त्याने बैलगाडी मध्ये चारा घेऊन चाललेल्या एका शेतकऱ्यासोबत झाली. गावातील या शेतकऱ्याने आपल्याला सकाळी रस्त्यावर अचानक अभिनेता सनी देओल भेटेल, अशी कल्पनाही केली नसावी. त्यामुळे त्याने सनी देवल यांनाच हातात हात देऊन तुम्ही तर सनी देवल सारखेच दिसता, असे म्हटले. पण जेव्हा त्याला आपल्याला भेटलेली व्यक्ती सनी देवलच आहे, हे कळलं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने त्यांना मी तुमच्या वडिलांचे खूप चित्रपट पाहिले असल्याचे सांगितले. तसेच तुमचेही चित्रपट आवडीने पाहत असल्याचे शेतकरी म्हणाला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.