अहमदनगर,दि.२३ मार्च,(प्रतिनिधी) – शहरातील सावेडी येथे बुधवारी (दि.22 मार्च) पहाटे गुढीपाडव्या निमित्त निघालेल्या चैत्र शोभायात्रेत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी सहभागी होऊन आरोग्याचा जागर केला व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर आरोग्य चळवळीच्या माध्यमातून योग, प्राणायामाचे धडे दिले जात आहे. तर वर्षभर वृक्षरोपण व संवर्धनाचे कार्य सुरु आहे. ग्रुपच्या सदस्यांनी निरोगी जीवनासाठी योग-प्राणायामाचे महत्त्व यावेळी विशद केले.
व्यंकटेश मल्टीस्टेट व रेडिओ सिटीच्या पुढाकाराने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, दीपक बडदे, मनोहर दरवडे, सर्वेश सपकाळ, डॉ. सुधा सुधाकर कांकरिया, डॉ. प्रकाश कांकरिया, नामदेव जावळे, विकास भिंगारदिवे, दीपक धाडगे, अभिजीत सपकाळ, सरदारसिंग परदेशी, अशोक पराते, सिताराम परदेशी, दिनेश शहापूरकर, आनंद सदलापूर, रामनाथ गर्जे, अविनाश काळे, राजेंद्र अकोलकर, सिद्धू तात्या बेरड, अविनाश जाधव, दिलीप जाधव, संतोष गोडसे आदी सहभागी झाले होते.
संजय सपकाळ म्हणाले की, सदृढ व निरोगी समाज होण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुप आरोग्य चळवळ चालवित आहे. यामध्ये अनेक सदस्य जोडले गेले असून, दररोज पहाटे योग-प्राणायाम केला जातो. तर ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा केला जातो. वर्षभर वृक्षरोपण मोहिम सुरु असून, लावलेल्या झाडांचे देखील संवर्धन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.