अहमदनगर,दि.२७ जानेवारी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्रचे महामहिम राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारीजी यांच्या हस्ते ‘स्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ.सुधा कांकरिया यांचा त्यांनी ३७ वर्ष केलेल्या अतुलनिय कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. डॉ.सुधा कांकरिया या अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ व समाजसेविका आहेत. त्यांनी वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या या संदर्भात काम केले आहे. त्यांचे प्रसिद्ध काम ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ व ‘नकोशीं’ या चळवळीत विशेष काम केले आहे. या कामाची दखल घेऊनच त्यांचा विशेष सन्मान केला आहे. या प्रसंगी महोदय रामदास आठवले, मेजर जनरल गगन दीप बक्शी, महावीर चक्र विजेता दिगेन्द्र कुमार, शौर्य पदक विजेता मधुसूदन सुर्वे, मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भावानजी, जय हिंद संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव मुधाने आदी उपस्थित होते.
For News and Advertisement:
Contact :
Baldev Bhingardive
Email = nagarsanchar@gmail.com