अहमदनगर,दि.२१ जानेवारी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ नुकताच निवडण्यात आला. अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचा संघ जळगावला आयोजित राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहे, अशी माहिती जिल्हा सचिव व मुख्य प्रशिक्षक संतोष बारगजे यांनी दिली. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या राज्य संघनेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनची जिल्हा स्पर्धा नुकतीच वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक प्रतिक चोरडिया, त्यांच्या पत्नी आकांक्षा चोरडिया, जिल्हा सचिव संतोष बारगजे, सहसचिव अलताफ कडकाले, नगरच्या संघटनेचे अध्यक्ष संजय शिंदे, पंच शकील सय्यद, सुरेश वाघ आदी उपस्थित होते.
विविध वजनी गटात झालेल्या स्पर्धेतून राज्य स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. यामध्ये मुली : आकांक्षा दराडे, रोहिणी गोरे, साक्षी परांडे, वेदश्री मुळे, रेणुका परदेशी, पल्लवी खंडागळे, मयुरी वाळके, श्वेता काळे, श्रेया पटवा, हर्षाली यादव, मुले : गौरव एडके, नितीन मस्के, संग्राम पाडळे, साई दंडवते, तेजस वारूळे, सागर राक्षे, शिवम कुलथे, रोशन कदम, आदिनाथ कडू व अभिजीत थोरात आदींची निवड करण्यात आली. वरिष्ठ पुमसे स्पर्धेसाठी शिवम कुलथे, रोहित गोंडगे व वेदश्री मुळे यांनी निवड करण्यात आली.
खेळाडूंना श्रीगोद्याचे सचिन अगळे, पाथर्डीचे गोरक्ष गालम, आंबादास साठे, राहत्याचे दिनेशसिंह राजपुत, संगमनेरचे लक्ष्मण शिंदे, पारनेरचे संतोष परांडे, नगरचे शकील सय्यद, सुरेश वाघ, बाबा क्षीरसागर, महेश टेमक, सुरज शिंदे, रवि यादव आदींचे मार्गदर्शन लाभले. निवडलेल्या संघाचे जिल्हा संघटेने मार्गदर्शक डॉ. अविनाश बारगजे, अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, जिल्हा सचिव संतोष बारगजे, उपाध्यक्ष किरण बांगर आदींनी अभिनंदन केले.