अहमदनगर,दि.१ जानेवारी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षानिमित्त निरीक्षण व बालसुधारगृह आणि बाबावाडी येथील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, कार्याध्यक्ष वसंतराव थोरात, जिल्हा उपाध्यक्ष सुहास धीवर, दत्ता रणसिंग, संघटक राजू साळवे, आसिफ शेख, मधुकर खताळ, अॅड. गणेश शेंडगे, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, निता देठ, विजया तरोटे आदींसह कास्ट्राईबचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात सुहास धीवर यांनी दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे प्रारंभ कास्ट्राईब संघटना वंचित घटकातील मुलांना भेट देऊन करत असल्याची माहिती दिली. यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांचा वाढदिवस देखील वंचित मुलांसह साजरा करण्यात आला. एन.एम. पवळे म्हणाले की, वंचितांसमवेत आनंद साजरा केल्याने समाधान मिळतो. सेलिब्रेशन करण्याची पध्दत बदलत चालली असून, उपेक्षितांना केलेली मदत हेच जीवनातील समाधानाचे सेलिब्रेशन असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.