Homeनगर शहरवंचित बहुजन आघाडीच्यावतीने अन्नधान्य वाटप

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अन्नधान्य वाटप

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

अहमदनगर,दि.१४ एप्रिल,(प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त इतर खर्चाला फाटा देत बाबावाडी येथे धान्य देउन विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या संस्थेत बलघर प्रकल्प येथे जेवण देण्यात आले. या वेळी नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कतकडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप, ज्येष्ठ सल्लागार जिवन पारधे, ज्येष्ठ नेते पोपटदादा जाधव, शहर उपाध्यक्ष अमर निरभवने, माथाडी जिल्हा सरचिटणीस सुनिल भिंगादिवे, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल काळपुंड, महीला आघाडी जिल्हा समन्वयक धनश्रीताई शेंडगे, भिंगार उपाध्यक्ष बबलु भिंगारदिवे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इतर सर्व खर्चाला फाटा देत सामाजिक भावनेने वंचित दुर्बळ घटकांना आधार देण्यासाठी हा उपक्रम राबवत असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थितांचे स्वागत संस्था संचालक युवराज गुंड सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ.राळेभात मॅडम यांनी मानले. MSW चे विद्यार्थी आशिष अहिरे, समाधान शिंदे, दर्शन गोडे, विवेक कोल्हे, मानली जाधव, संजय जाधव यांनी विशेष  परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!