Homeनगर जिल्हामहाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषद अहमदनगरची जिल्हा कार्यकारणी जाहीर

महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषद अहमदनगरची जिल्हा कार्यकारणी जाहीर

अहमदनगर,दि.१३ डिसेंबर,(प्रतिनिधी) – मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदेची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी जाहीर केली. शेख यांनी सुचवलेल्या नवीन कार्यकारणीच्या नावावर मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, राज्य अध्यक्ष शरद पाबळे व डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी शिक्कामोर्तब करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषद अहमदनगर शाखेची पायाभरणी करुन मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांनी मागील महिन्यात शहरात येऊन आफताब शेख यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली होती. तर जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्याचा अधिकार त्यांना दिला होता. यानुसार शेख यांनी नुकतीच जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे.

महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषद अहमदनगर पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष- नितीन ओझा (शिर्डी), अमोल कांकरिया (पाथर्डी), सचिव- नासीर पठाण (जामखेड), सरचिटणीस- गोरक्षनाथ मदने (संगमनेर), सह-सरचिटणीस- संदीप दातखीळे (अकोले), संपर्क प्रमुख- अविनाश देशमुख (शेवगाव), खजिनदार- गणेश जेवरे (कर्जत), मार्गदर्शक- प्रदीप पेंढारे (अहमदनगर), कार्यकारिणी सदस्य- गणेश आवारी (अकोले), अविनाश बोधले (कर्जत), शरद पाचारणे (राहूरी), मुस्ताक पठाण (श्रीगोंदा), ज्ञानेश सिन्नरकर (नेवासा), अमित आवारी (अहमदनगर), प्रकाश साळवे (अहमदनगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी डिजीटल माध्यमात कार्य करणार्‍या युवा पत्रकारांना बरोबर घेऊन काम केले जाणार आहे. नवीन कार्यकारणीतील पदाधिकारी डिजीटल मीडिया मधील पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार  आहे. तसेच नगर शहर व तालुकास्तरीय कार्यकारणी देखील जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूर शेख यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!