नवी दिल्ली, १९ मे २०२३ – भारतीय रिझर्व बँकेचा मोठा निर्णय २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, २००० रुपयांची नोट चलनातून बाहेर काढली जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना २००० रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे.
रिझर्व्ह बँकेने ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येतील.रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, २३ मे २०२३ पासून कोणत्याही बँकेत २००० रुपयांच्या नोटा एका वेळी इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलल्या जाऊ शकतात. नोट बदलण्याची मर्यादा २०,००० रुपये आहे.
रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात २००० रुपयांच्या नोटेबाबत बरीच माहिती दिली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०१९-२०, आर्थिक वर्ष २०२०-२१ आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २००० रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. त्यामुळे बाजारात २००० रुपयांच्या नोटांचे चलन कमी झाले आहे.