अहमदनगर,दि.१४ एप्रिल,(प्रतिनिधी) – नागापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी समाज मंदिर परिसरातील अतिक्रमण काढून स्वच्छता करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा महिला आघाडीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी प्रभाग अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
महापालिका हद्दीतील नागापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर आहे. या मंदिर परिसरात लाकडे व इतर टाकाऊ वस्तू टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. सदर परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार असून, या समाज मंदिर परिसरातील अतिक्रमण काढून स्वच्छता करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.