मुंबई,दि.२९ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या 19 वर्षांखालील मुलींनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. भारतीय महिलांनी इतिहास घडवत प्रथमच आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकला आहे. रविवारी टीम इंडियाचा अंतिम सामना इंग्लंडच्या संघाविरुद्ध होता. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवणाऱ्या इंग्लंडची फायनलमध्ये घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. भारतीय खेळाडूंच्या गोलंदाजीपुढे इंग्लडची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. इंग्लंडचा संपूर्ण संघ 17.1 षटकांत 68 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून रायन मॅकडोनाल्ड गेने सर्वाधिक १९ धावा केल्या. त्याचवेळी सोफिया स्मेल आणि अलेक्स स्टेनहाऊसच्या बॅटमधून 11-11 धावा झाल्या. टीम इंडियाच्या खेळाडूंपुढे विजयासाठी अवघ्या 69 धावांचे आव्हान दिले होते.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 17.1 षटकांत 68 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून रायन मॅकडोनाल्ड गेने सर्वाधिक 19 धावा केल्या. त्याचवेळी सोफिया स्मेल आणि अॅलेक्स स्टेनहाऊसच्या बॅटमधून 11-11 धावा झाल्या. संधूने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या लिबर्टी हीपला ( 0) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात अर्चना देवीने इंग्लंडच्या निआम्ह हॉलंडचा (10) त्रिफळा उडवला.
कर्णधार ग्रेस स्क्रीव्हन्सला (4) देवीने बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. संधूने सामन्यातील दुसरी विकेट घेताना सेरेन स्मेलची विकेट घेतली. त्यानंतर चोप्राने दोन धक्के दिले.भारताकडून टी. साधू, पार्श्वी चोप्रा आणि अर्चना देवी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर मन्नत कश्यप, सोनम यादव आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडने भारतासमोर वर्ल्ड कप विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 69 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान भारताने लीलया पेलले आणि अवघ्या 13 ओव्हरमध्ये इंग्लंडने दिलेले 69 धावांचे आव्हान पूर्ण केले. भारतीय संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.
कर्णधार शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने हा करिष्मा करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेत आयसीसीच्या अंडर 19 महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात भारतीय संघ सुरुवातीपासूनच प्रभावी ठरला. ग्रुप सामने आणि सुपर सिक्समध्ये केलेल्या अव्वल दर्जाच्या कामगिरीनंतर भारताने सेमी फायनल सामन्यातही न्यूझीलंडचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला होता.