हेल्थ, ८ जून २०२३ – दुध हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. लहान मुले दुध व दुग्धजन्य पदार्थ खाताना नाक मुरडतात. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले की, हाडे ठिसूळ होतात ज्यामुळे उठताना-बसताना आपल्याला त्रास होता.
परंतु, जर मुलांना दुधाचे पदार्थ खाण्यास आवडत नसतील तर आपण त्यांना नाचणीचे पदार्थ खाऊ घालू शकतो. ज्यामुळे त्यांच्या शरीरात लॅक्टोज इंटोलरन्ट शरीरात निर्माण होतो. नाचणी ही कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये 100gm मध्ये साधारण 364 mg कॅल्शियम असते. असे, मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी आहारतज्ज्ञ आणि क्लिनीक पोषणतज्ज्ञ उषाकिरण सिसोदिया यांनी सांगितले आहे.
1. कोणत्या पध्दतीने तुम्ही नाचणीचे सेवन करु शकता?
नाचणी ही विविध वयोगटासाठी योग्य आहे आणि त्याचे विविध पदार्थ प्रत्येकाच्या आवडीनुसार तयार केले जाऊ शकतात. नाचणीच्या पिठापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जाऊ शकतात. उदा. डोसा, इडली, डाळ, भाकरी, उपमा इत्यादी.
नाचणी ही ग्लूटेन-फ्री पदार्थ आहे. जी ग्लूटेन आणि दुग्धजन्य पदार्थांवर फायदेशीर ठरेल. नाचणीमध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. दूधात फक्त कॅल्शियमचाच नाही तर प्रोटीन, व्हिटॅमिन ‘डी’, व्हिटॅमिन ‘बी’ यांचा देखाल पुरवठा असतो.
2. दूधाचे पर्याय
जर तुम्हाला दुध प्यायला आवडत नसेल किंवा दुधाची अॅलर्जी असेल तर तुमच्याकडे शरीरात कॅल्शियमचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. ” दही आणि ताकासारखे दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असलेले पर्याय आहेत.
याव्यतिरिक्त, शेंगदाणा, बदाम, काजू आणि बिया कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहेत. त्याचबरोबर सुके खोबरे हे देखील इतर आवश्यक पोषक तत्त्वांसह कॅल्शियम असते. पण त्यांच्यातील उच्च कॅलरीजमुळे त्यांचे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे.
आपल्या दैनंदिन आहारात नाचणीचा समावेश केल्याने यातील उच्च आहारातील फायबर सामग्री, कमी ग्लायसेमीक निर्देशांक आणि उच्च कॅल्शियम सामग्री यांच्यामुळे ते फायदेशीर ठरते.