मुंबई, १२ मे २०२३ – सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर लांबणीवर पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालामुळं शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. पण आज, गुरुवारी सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. शिंदे सरकार स्थिर असून, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद कायम राहणार आहे, असे जवळपास स्पष्ट झाले आहे.
राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी शिंदे गटातील आमदारांमध्ये अहमहमिका लागली होती. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात १९ जणांचा शपथविधी होणार आहे. आता मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळतं, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
ठरल! शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार होणार
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on