Homeनगर जिल्हासाईभक्तांना घेऊन जाणाऱ्या बसला नाशिक-शिर्डी हायवेवर भीषण अपघात, १० ठार

साईभक्तांना घेऊन जाणाऱ्या बसला नाशिक-शिर्डी हायवेवर भीषण अपघात, १० ठार

शिर्डी,दि.१३ जानेवारी,(प्रतिनिधी) – नाशिक शिर्डी महामार्गावर साईभक्तांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला झालेल्या अपघातात १० भाविक ठार झाले आहेत, तर १२ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांमध्ये ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर व बदलापूर येथील नागरिकांचा समावेश आहे. वावी पाथरे गावाजवळ आज पहाटे हा अपघात झाला.

साई दर्शनासाठी भाविकांना घेऊन ही बस (क्र MH 04 SK 2751) शिर्डीच्या दिशेनं निघाली होती. या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. शिर्डीहून सिन्नरच्या दिशेनं येणाऱ्या मालवाहू ट्रकशी (MH 48 T 1295) या बसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात दहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिला, दोन पुरुष व दोन लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी दिली. जमखी झालेल्या प्रवाशांपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. जखमींना नाशिक व सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!