अहमदनगर,दि.१९ मार्च,(प्रतिनिधी) – लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या सेवेची परंपरा आणि सामाजिक बांधिलकीतुन ३० वर्षे विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांचे मार्गदर्शनाखाली करून समाजात एक चांगला संदेश दिल्याचे प्रतिपादन लायन्स प्रांतीय महिला अध्यक्षा सौ. उषा तिवारी यांनी मिडटाऊनच्या संचालक मंडळाच्या सभेत प्रतिपादन केले.
या कार्यक्रमांस क्लब चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव प्रसाद मांढरे, कोषाध्यक्ष संदीपसिंग चव्हाण, श्रीकांत मांढरे, सौ. संपूर्णा सावंत, सुनंदा तांबे, सौ. माधवी मांढरे, पूजा चव्हाण, स्वाती जाधव प्रभूती उपस्थित होते. प्रारंभी श्रीकांत मांढरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सौ. उषा तिवारी यांचे स्वागत केले. क्लब चे सचिव प्रसाद मांढरे यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. अध्यक्ष श्रीनिवास बोज्ज यांनी आगामी काळात घेण्यात येणाऱ्या उपक्रमा विषयी माहिती दिली. पर्यावरणाचे कार्य मिडटावून चे वतीने सातत्याने केले जाते त्याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम सौ. उषा तिवारी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड सौ. सुनंदा तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. संपूर्णा सावंत यांनी मानले.