Homeनगर शहरपोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ख्रिसमस साजरा

पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ख्रिसमस साजरा

सांताक्लॉजच्या रुपाने वाढला आनंद आणि उत्साह

अहमदनगर,दि.२६ डिसेंबर,(प्रतिनिधी) – पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये नाताळ आणि नवीन वर्षांचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.  या प्रसंगी अहमदनगर रिव्हर ऑफ जॉय शिपचे प्रमुख अरहम चेरियन व त्यांची टीम, तसेच सिस्टर रिबेका उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य श्री. मंगेश जगताप यांनी  अहमदनगर रिव्हर ऑफ जॉय शिपचे प्रमुख अरहम चेरियनव त्यांची टीम यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

या प्रसंगी अहमदनगर या क्वांयर ग्रुपने येशू ख्रिस्त आणि नाताळची गाणी गायली व प्रार्थना म्हटली. त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नाताळच्या निमित्ताने ख्रिसमस ट्री व शाळा सजावट केली होती. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांनी सांगितले की, आपल्याकडे असलेले दुसऱ्याला देण्यात खरा आनंद आहे. म्हणून आपल्याकडे असलेले ज्यांच्या कडे नाही त्यांना ते द्या. एकमेकांना समजून घेऊन आनंद वाटा. म्हणजे येणारे नवीन वर्ष सर्व काही सुरळीत होणारे व आनंदी, आरोग्यादायी जाईल अशीच आपण येशूख्रिस्त चरणी प्रार्थना करू या. तसेच याप्रसंगी लकी ड्रॉ द्वारे विद्यार्थ्यांना सांताक्लॉज करून भेटवस्तू देण्यात आल्या. शाळेतील शिक्षिका सौ तृप्ती सोनवणे यांनी

याप्रसंगी विद्यार्थ्यांना येशू ख्रिस्त व त्याच्या सर्व आठवणी याविषयी माहिती सांगितली . तसेच या प्रसंगी पाचवी व सहावीतील विद्यार्थ्यांनी नाताळ विषयी माहिती सांगणारी नाटिका सादर केली. या वेळी सर्व विद्यार्थ्यानी  नृत्य करत येशू ख्रिस्ताची गाणी म्हणत कार्यक्रमाचा आनंद लुटला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका कु. नताशा अमर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. डायना सात्राळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!