अहमदनगर,दि.६ जानेवारी,(प्रतिनिधी) – जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा चेस सर्कलतर्फे प्रथमच अखिल भारतीय १६०० पेक्षा कमी मानांकित खेळाडूंसाठी बडीसाजन मंगल कार्यालय येथे स्पर्धेचे उदघाटन राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन करण्यात आले यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारूनाथ ढोकळे, श्याम कांबळे, विद्याधर जगदाळे, संजय खडके, देवेंद्र ढोकळे, चेतन कड, श्रीकांत वाखारे, दत्ता घाडगे, नवनीत कोठारी, प्रकाश गुजराथी, अनुराधा बापट, डॉ. स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे आदी उपस्थित होते.
यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट सर यांनी प्रास्ताविकात संघटने विषयी माहिती सांगून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तर उद्घाटनाप्रसंगी बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की बुद्धिबळ खेळात अहमदनगर शहर हा मागे कधीच नसतो व अनेक वर्षापासून बुद्धिबळ स्पर्धेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्यातून व राज्याबाहेरील खेळाडूंचा प्रतिसाद मिळत असून आम्ही १६०० च्या खाली मानांकित स्पर्धेची ही संकल्पना अहमदनगर मधून चालू केली याला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला असून या तीन दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेतून विविध राज्यातून खेळाडू आले असून बुद्धिबळ खेळ हा वाढत असल्याचे सांगितले.
तसेच या स्पर्धेचे पंच म्हणून प्रवीण ठाकरे (जळगाव), सागर गांधी, प्रीती समदानी (औरंगाबाद), पारूनाथ ढोकळे (नगर) हे काम पाहत आहेत. या स्पर्धेत राज्यातून ३२० स्पर्धक सहभागी झाले असुन ही संपूर्ण स्पर्धा शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे प्रायोजित केले असुन या स्पर्धेतील विजेत्यांना ३१ हजार रुपयांची रोख पारितोषिक मिळणार असुन ९ वर्षां खालील खेळाडूंना, महिलांना, जेष्ठांना व विना मानांकित खेळाडूंना सुध्दा रोख पारितोषिके देण्यात येणार असुन तसेच प्रत्येक गटात उतेजनार्थ पाच करंडक सुद्धा देण्यात येणार आहेत. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी व उपस्थित प्रेक्षकांनी खेळाडूंना ‘ऑल दी बेस्ट’ म्हणत शुभेच्छा दिल्या. व विविध रोमांचक बुद्धिबळ स्पर्धेचे अनुभव नगरकरांना बघण्यासाठी बुद्धिबळ संघटनेचे विश्वस्त पारुनाथ ढोकळे यांनी आव्हान केले आहे.