Homeमहाराष्ट्रऔरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची मंजूरी

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची मंजूरी

मुंबई,दि.२४ फेब्रुवारी, २०२३ – महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यास केंद्राची अनुमती असल्याचे म्हटले होते. तसेच, आता औरंगाबाद शहराचेही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे मोठे यश म्हणावे लागेल. 

केंद्र सरकारच्या या निर्णयाची प्रत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. तसेच,

‘औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!’ असेही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!