Homeनगर शहरडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचा शहरात आनंदोत्सव साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचा शहरात आनंदोत्सव साजरा

अहमदनगर,दि.१५ जानेवारी,(प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने शहरात मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या लढ्यात हुतात्मे झालेल्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, आयटी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, सावेडी अध्यक्ष विनोद भिंगारदिवे, युवक शहराध्यक्ष निखिल साळवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सूर्यवंशी, युवक तालुका उपाध्यक्ष विलास साळवे, सदाशिव भिंगारदिवे, रोहित कांबळे, चंद्रकांत भिंगारदिवे, बबन भिंगारदिवे, पद्माकर भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, वसंत भिंगारदिवे, संदीप भिंगारदिवे, रामा भिंगारदिवे, विलास भिंगारदिवे, बाळासाहेब देठे, हेमंत खरे आदी उपस्थित होते.

युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, 17 वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर सरकारने माघार घेऊन मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार केला. या नामविस्ताराचा लढा एक प्रदीर्घ संघर्ष होता. चाळीशी-पन्नाशीतल्या लोकांनी हा लढा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे भोगला आहे. त्या नामांतर लढ्यानं दिलेले घाव आजही ताजे आहेत. इतिहास विसरणारे भविष्य घडवू शकत नाहीत. पण काही मंडळी इतिहासच बदलून लोकांची दिशाभूल करत आहे. त्यामुळेच आपला इतिहास कायम स्मरणात राहून भावी पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा लढा प्रेरणादायी आहे. हा लढा कुणाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारा नव्हता. हा लढा आंबेडकरी चळवळीच्या अभिमानाचा प्रश्‍न होता. नामांतरासारख्या लढ्याची ओळख नव्याने करून देण्याची गरज आहे. तरच इतिहास बिघडवणे वा बदलणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!