अहमदनगर, ९ मे २०२३ – अहमदनगर शहरात बुलेटची चोरी करून त्याचे पार्ट सुटे करून विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे . त्यातील चोरांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
२० फेब्रुवारी रोजी मनीष मदनलाल फुलढाळे यांची बुलेट ख्रिस्त गल्ली येथून चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना चोरीस गेलेली बुलेट अहमद मुन्ना शेख (रा. मुकुंदनगर) याने चोरी केली व ती साथीदार शाहरुख आलम शेख (रा. नागरदेवळे) याच्या घरात लपवून ठेवल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी सदर बुलेट आम्ही चोरुन नंतर तीचे सर्व स्पेअरपार्ट वेगवेगळे करुन ते भंगार दुकानदार जावेद रऊफ शेख (रा. सादिकमळा, भिंगार) व राम विलास ससाणे (रा. गजराजनगर) यांना विक्री केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी त्यांना अटक करुन चोरीस गेलेल्या बुलेटचे स्पेअर पार्टस्, इंजिन, चेसीज हस्तगत केली आहे. अधिक तपास पोना बाळासाहेब मासळकर हे करीत आहेत. कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे, पोहेकॉ तनवीर शेख, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना ए. पी. इनामदार आदींनी केली.
अहमदनगर मध्ये बुलेट चोरून विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Recent Comments
Hello world!
on