Homeनगर जिल्हाबीडसांगवी परिसरात रानडुक्कराचे थैमान

बीडसांगवी परिसरात रानडुक्कराचे थैमान

शांतीलाल कासवा या शेतकऱ्यांची २ एकर ज्वारी भुईसपाट

आष्टी,दि.९ जानेवारी,(प्रतिनिधी) – बीडसांगवी परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील डोंगरात रानडुक्कराचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. हे रानडुक्कर खाद्यासाठी शेतकऱ्यांचा पिकांचे नुकसान करत असून बीडसांगवी परिसरातील सर्वे नंबर ११९/६ मधील शांतीलाल झुंबरलाल कासवा या शेतकऱ्यांची हातातोंडाला आलेले दोन एकर ज्वारीचे पीक मुळासकट कुरतडुन पूर्णपणे नुकसान केले आहे. खाण्यापेक्षा नुकसान जास्त करत या रानडुकरांनी अक्षरशः या शेतकऱ्याच्या पिकाची वाट लावली आहे. यावेळी मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी कासवा हे हवालदिल झाले आहेत.

बीडसांगवी परिसरात रानडुक्करांचा मोठ्याप्रमाणात वावर असल्याने एक-दोन नव्हे तर २५ ते ३० रानडुक्कराचा कळप येऊन शेतकरी शांतीलाल झुंबरलाल कासवा यांचे २ एकर ज्वारी तर त्यांच्या शेजारील लक्ष्मण नरवडे यांची १ एकर ज्वारी भुईसपाट केली आहे. रानडुक्कराचा मोठा कळप आल्याने हल्ल्याच्या भितीने एकटा शेतकरी डोळ्यासमोर पीक उध्वस्त करत असताना ही काहीच करू शकत नाही. रानडुकरांचा उपद्रव या भागात चांगलाच वाढला असून शेतकऱ्याचे शस्त्र परवाने द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांची स्वतः संरक्षण होईल तसेच बिबट्याचेही या परिसरात वावर असल्याने रानडुकराचा पाठलाग करत बिबट्या ज्वारीपर्यंत येतो.

तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी

या जनावरामुळे शेतकऱ्यांना सुध्दा धोका निर्माण होऊ शकतो. रानडुक्कराला उपद्रवी वन्य प्राणी म्हणून घोषित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रानडुकरांची संख्या वेगाने वाढत आहे आणि त्यातून अवकाळीने आधीच हतबल झालेला शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात देखील सापडला आहे. रानडुक्करांचा नुकसानी नंतर ही वनविभाग याकडे सफसेल दुर्लक्ष करत असल्याचे दिसत असून त्या शेतकऱ्यांला मदती ऐवजी सारवासारव करत असल्याची भूमिका घेत आहे. वनविभागाने याची नोंद घेऊन भयभीत शेतकऱ्यांला धीर देत तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई दयावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे. अन्यथा वनविभागासमोर आंदोलन करणार असल्याचाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!