दिल्ली, २३ जानेवारी २०२३ –
भर वेगात जाणाऱ्या डंपरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक दिली आहे. या भयंकर घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहे. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील उन्नाव शहरात आज (रविवार) सायंकाळी घडली आहे. त्यावेळी दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. यावेळी पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनकडे जाणाच्या प्रयत्न केला आहे. मात्र, अपघात पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकचालकासह काही पोलिसांना देखील चोप दिला आहे.
पोलिसांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र लोक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान, संतप्त जमावाने दगडफेक सुरू केली. ट्रकचालकाला घेऊन जाणाऱ्या कॉन्स्टेबलला जमावाने बेदम मारहाण केली आहे. अनेक पोलिस ठाण्यांच्या पोलिसांसह एसपी आणि एएसपी घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांनी लोकांना समज देऊन शांत केले आहे. या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.