मुंबई, 7 मे २०२४ (ऑनलाईन वृत्त) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतल्या नंतर ते आता ऍक्टीव्ह मोडमध्ये आले आहे. सत्तेचा गैरवापर कसा होतो हे भाजप ने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रामधील उद्धव ठाकरे यांच्या काळातील सरकारमध्ये जे लोकं बाजूला गेले ते कशासाठी गेले का गेले? त्यांचे त्यांना माहिती पण हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला पटला नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजप सरकारला लगावला आहे. लहान मुलांच्या मुखात खोके आणि खोकेवाला
सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी ते म्हणाले की, शिंदे सरकारला जनमाणसाचा पाठिंबा मिळवता आलेला नाही. सध्या लहान मुलांच्या मुखात खोके आणि खोकेवाला हा शब्द आला आहे. राज्यातील राजकारण स्वच्छ करायचे असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे लागेल, असं ठामपणे शरद पवारांनी म्हटले आहे.
तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील पवारांनी निशाणा साधला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत पवारांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र ते ५ वर्ष मुख्यमंत्री झाले नंतर ते उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे आम्ही आधीच आश्वासन देत नाही.
सत्तेचा गैरवापर कसा होतो हे भाजपने दाखवून दिलं…,शरद पवार
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on