नवी दिल्ली,दि.२ मे २०२३ (ऑनलाईन वृत्त) – मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गांधी यांना दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 2019 च्या ‘मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणी दोषी ठरविण्यास स्थगिती मिळावी यासाठी राहुल गांधी यांच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवले आहे. न्यायमूर्ती हेमंत प्रचारक सुट्टीनंतर निकाल देणार आहेत. तोपर्यंत राहुल गांधींना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
गुजरात हायकोर्टात मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या “मोदी आडनाव” टिप्पणीबद्दल 2019 च्या गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यातील त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. उन्हाळी सुट्या संपल्यानंतर गुजरात उच्च न्यायालय या प्रकरणावर निकाल देणार आहे. दरम्यान मार्चमध्ये राहुल गांधी यांना 2019 च्या मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते आणि सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.
सुरत न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी राहुल गांधींना अंतरिम संरक्षण नाकारले. जूनमध्ये सुट्टीनंतर निकाल देणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
गुजरात हायकोर्टात मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या “मोदी आडनाव” टिप्पणीबद्दल 2019 च्या गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यातील त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. उन्हाळी सुट्या संपल्यानंतर गुजरात उच्च न्यायालय या प्रकरणावर निकाल देणार आहे.
‘मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणात राहुल गांधीबाबत मोठी उपडेट, कोर्टाने दिला निर्णय
Recent Comments
Hello world!
on