Homeदेश-विदेशनवीन वर्षात करदात्यांना मोठा दिलासा, उत्पन्नावर लागणार फक्त ५% कर

नवीन वर्षात करदात्यांना मोठा दिलासा, उत्पन्नावर लागणार फक्त ५% कर

नवी दिल्ली,दि.१ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – नवीन वर्षात करोडो करदात्यांना आनंदाची बातमी आहे. तुम्हीही इन्कम टॅक्स भरत असाल तर आतापासून तुम्हाला फक्त ५% टॅक्स भरावा लागेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. देशभरात अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे, अशा स्थितीत मध्यमवर्गीयांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांनाच यावेळी करसवलतीची मोठी अपेक्षा आहे.

माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आतापासून अनेकांना फक्त ५% कर भरावा लागेल. तुम्ही नवीन करप्रणाली स्वीकारा किंवा जुनी करप्रणाली, पण आता तुम्हाला जास्त कर भरावा लागणार नाही. २.५ लाख ते ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना ५ टक्के दराने कर भरावा लागेल. करदात्यांना यापेक्षा जास्त कर भरावा लागणार नाही. जर तुमचे उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.

बजेटमध्ये सरकार करमुक्त उत्पन्नाची व्याप्ती वाढवू शकते. सध्या लाखो लोकांना फक्त 2.5 लाख रुपयांपर्यंतच करमाफीचा लाभ मिळतो. ही मर्यादा ३ ते ५ लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. यावेळी सरकार करोडो करदात्यांना मोठा लाभ देऊ शकते. २०१४ मध्ये सरकारने कर मर्यादा वाढवली होती. यापूर्वी ही मर्यादा २ लाख रुपये होती, ती वाढवून २.५ लाख रुपये करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना गुंतवणुकीसाठी अधिक पैसे मिळतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!