अहमदनगर, (प्रतिनिधी) – नगर तालुका कबड्डी स्पर्धेत श्री भैरवनाथ विद्यालय, आगडगाव या विद्यालयाने तालुक्यात 14 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. भैरवनाथ विद्यालयाने सलग तीन वर्षे विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. सहभागी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उध्दवराव दुसुंगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंखे तसेच तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे यांनी अभिनंदन केले.
अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांना खेळात गोडी निर्माण व्हावी यासाठी क्रीडा शिक्षक रवींद्र हंबर्डे कायम प्रयत्नशील असतात. या विजयात सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय जिद्दीने खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रवींद्र हंबर्डे, खर्षे सर, श्रीमती दुसुंगे मॅडम. श्रीमती भापकर, ठोंबे यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.