मुंबई, २१ जानेवारी २०२३ – पीएम मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीवरील ट्विट, यूट्यूब व्हिडिओ ब्लॉक करण्याचे केंद्राचे आदेश आहेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (BBC) तयार केलेल्या डॉक्यूमेंट्रीवरुन वाद निर्माण झाला असताना केंद्राने आता मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या पहिल्या एपिसोडचे यूट्यूबवर शेअर केलेले सर्व व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.
‘इंडियाः द मोदी क्वेश्चन’ या बीबीसी डॉक्युमेंटरीच्या यूट्यूब व्हिडीओच्या लिंक असलेले ५० हून अधिक ट्विट ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटरला देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन बीबीसीकडून करण्यात आले आहे. केंद्र सरकारने ट्विटर आणि युट्यूबला डॉक्यूमेंट्री संबंधित सर्व लिंक काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
याआधी केंद्राने ही डॉक्यूमेंट्री मोदींच्या विरोधातील अप्रप्रचाराचा भाग असल्याचे म्हटले होते. या डॉक्यूमेंट्रीमध्ये 2002 गुजरात दंगलीचा संदर्भ देत मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, भारतात 2002 मध्ये गुजरात मध्ये झालेल्या दंगली संदर्भात बीबीसीच्या एका डॉक्युमेंटरी संदर्भातील एक क्लिप व्हायरल होत आहे. ती ब्लॉक करण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहे. ही डॉक्युमेंटरी एक दुष प्रचाराचा भाग आहे या डॉक्युमेंटरी निष्पक्षतेची कमी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरदींब बाग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
सदर डॉक्युमेंटरी भारतात प्रदर्शित करण्यात आलेली नसल्याचे देखील परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने यूट्यूब-ट्विटर वरील व्हिडीओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहे. तसेच IT Rules 2021 च्या नुसार हे आदेश दिल्याचेही स्पष्ट केले आहे. या डॉक्युमेंटरी मागे एक अजेंडा असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. बीबीसी ने दोन भागात प्रसारित केलेली डॉक्युमेंटरी 2002 मधील गुजरात दंगली संदर्भात प्रश्न उपस्थित करते. या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे.