आपल्या आयुष्यामध्ये यश (Sucsess) मिळवण्यासाठी फक्त मेहनतच महत्वाची नसते तर नशिबाचाही मोठा हात असतो. ही गोष्टी बऱ्याचदा तुम्ही तुमच्या कुटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून ऐकली असेल. हे करु नको ते करु नको असे सल्ले ही त्यांनी तुम्हाला दिले असतील. त्याचसोबत यासाठी त्यांनी अनेक वास्तु उपायही तुम्हाला सांगितले असतील. यापैकी एक वास्तू उपाय (Vastu Tips) म्हणजे सकाळी उठल्यानंतरही काही
गोष्टींकडे लक्ष न देणे.वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे की, रोज सकाळी उठल्यानंतर चुकून या 5 गोष्टींकडे पाहू नका. जर तुम्ही या पाच गोष्टींकडे पाहिले तर तुमचा दिवस खराब जाईल. त्याचोसबत तुम्ही गरीब देखील होऊ शकता. आता या पाच गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि वास्तुशास्त्रात याबद्दल काय सांगण्यात आले आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत…सकाळी उठल्यानंतर खाली सांगितलेल्या 5 गोष्टी पाहू नका –
तुटलेली मूर्ती –
वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, देव-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती चुकूनही घरात ठेवू नका. कोणतीही मूर्ती तुटलेली असेल तर ती कपड्यात गुंडाळून पूजा स्थळाशिवाय कुठेतरी सुरक्षित ठेवून द्या. सकाळी उठल्यावर चुकूनही त्या तुटलेल्या मूर्ती पाहू नका. जर चुकून तुम्ही या मूर्तींकडे पाहिले तर तुमच्या जीवनातील दु:ख वाढतील.
आरशात पाहू नका –
सकाळी उठल्याबरोबर कधीही आरशात पाहू नका. असे करणे म्हणजे मनातील अहंकार वाढण्याचे लक्षण आहे. त्याचबरोबर असे केल्यामुळे तुम्ही केलेली कामं खराब होऊ लागतात. म्हणूनच सकाळी उठल्यावर आरशात न बघता सर्वप्रथम पूजागृहात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
स्वयंपाकघरातील खरकाटी भांडी पाहू नका –
वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की, रात्री झोपताना जेवलेली भांडी स्वयंपाकघरात पडून देऊ नका. असे केल्याने माता लक्ष्मी दुःखी होते. सकाळी उठल्यावर माणसाची पहिली नजर खरकट्या भांड्यावर पडली तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो. पती-पत्नीच्या नात्यावरही याचा परिणाम होतो आणि घरातील वातावरण बिघडते.
तुमची सावली पाहू नका –
वास्तुशास्त्रातील नियमांनुसार, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमची सावलीपाहणे अशुभ मानले जाते. हे जीवनातील अंधार, एखाद्याचा मृत्यू किंवा घरगुती कलहाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे तुम्हीही ही चूक करत असाल तर ही सवय लगेच बंद करा. नाही तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागेल.
बंद घड्याळ पाहू नका –
सकाळी डोळे उघडल्यानंतरच समोर बंद घड्याळ दिसले तर हे एखाद्या वाईट गोष्टीचे लक्षण आहे. असे मानले जाते की, तुमच्या आयुष्यात मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी घड्याळ खराब होताच त्याची तातडीने दुरुस्ती करावी. नाहीतर भिंतावर लावलेले हे घड्याळ तात्काळ काढून ठेवावे.