Homeमहाराष्ट्रआळेफाट्याला उन्हात आमदार लंके गाडीतून खाली उतरले अन्…

आळेफाट्याला उन्हात आमदार लंके गाडीतून खाली उतरले अन्…


अहमदनगर, १४ मे २०२३ – रविवारच्या सुट्टीचा दिवस अल्याने रस्त्यावर प्रचंड वाहतूक. त्यातच तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओळांडल्याने सहन न होणारे ऊन. अशात आळेफाटा येथे ट्रॅफिक जाम लागलेलं. कित्येक वाहने अडकून पडलेली. आसपास पोलिस दिसत नव्हते. हे दृष्य पाहून तेथून निघालेले पारनेरचे आमदार निलेश लंके गाडीतून उतरले. सोबतच्या कार्यकर्त्यांसह चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करू लागेल. त्यांना पाहून प्रथम आसपाचे दुकानदार आणि नंतर पोलिस मदतीला आले. काही वेळात भर उन्हात अडकून पडलेल्या वाहनचालकांची सुटका झाली.


पारनेरचे आमदार निलेश लंके रविवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देहणे येथे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. सोबत बापू शिर्के, चंद्रकांत मोढवे, संदीप शिंदे, भाऊ साठे, ओंकार गारूडकर हे कार्यकर्ते होते. आळेफाटा येथून जात असताना चौकात वाहतुकीची कोंडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बराच काळ वाहतूक सुरू होती नव्हती. त्यामुळे पुढचा मागचा विचार न करता आमदार लंके उघड्या डोक्याने गाडीतून खाली उतरले. चालतच चौकात आले. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही आले. त्यांनी तेथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कोणी तरी पोलिसांना कळविले. त्यामुळे अर्ध्या तासाने पोलिसही तेथे आले.

दरम्यान, एसटी बस आणि इतर वाहनांत तासंतास अडकून पडलेल्या प्रवाशांची सुटका झाली. चौकातून जाताना खुद्द आमदार वाहतूक नियंत्रण करीत असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशी त्यांना धन्यवाद देत होते.

तोपर्यंत बऱ्यापैकी रस्ता मोकळा झाला होता. पोलिसांसोबत आणखी काही काळ काम करून वाहतूक सुरळीत झाल्यानंतरच आमदार लंके आणि त्यांचे कार्यकर्ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!