Homeक्रीडाआशिया कप पाकिस्तानमध्ये होणार नाही.. या ठिकाणी होणार आयोजन

आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार नाही.. या ठिकाणी होणार आयोजन

मुंबई,दि.५ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – बहरीनमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात बैठक पार पडली. या पहिल्या औपचारिक बैठकीनंतर एक निर्णय घेण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) मार्चमध्ये आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पर्यायी स्थळाचा निर्णय घेईल, असे ठरले आहे. दरम्यान, एशियन क्रिकेट काऊन्सीलच्या या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नमज सेठी आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यात जबरदस्त खडाजंगी झाल्याचे समजते.

आशिया कप २०२३ च्या आयोजन आणि यजमानपदावरून भारत – पाकिस्तान यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भारताचा पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास विरोध आहे. त्यामुळे आशिया कप २०२३ चे यजमान पद जरी पाकिस्तानकडे असले तरी स्पर्धा मात्र त्रयस्थ ठिकणी खेळवण्याकडे एशिया क्रिकेट काऊन्सीलचा कल आहे. याबाब अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

आशिया कपच्या यजमानपदाचे अधिकार सुरुवातीला पाकिस्तानला देण्यात आले. त्याचे आयोजन सप्टेंबर २०२३ मध्ये होणार होते, परंतु एसीसीसीचे प्रमुख शाह यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले की, भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएईची तीन ठिकाणे – दुबई, अबू धाबी आणि शारजाह हे या स्पर्धेचे यजमानपदासाठी प्रबळ दावेदार आहेत, परंतु निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.

दरम्यान, एसीसी अधिकाऱ्याने सांगितले की आशिया कप २०२३ च्या ठिकाणाबाबतचा अंतिम निर्णय हा पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र असे असले तरी यापूर्वीच स्पर्धा ही पाकिस्तानातून हलवून त्रयस्थ ठिकाणी घेण्यात येईल असं ठरलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!