Homeनगर जिल्हानगर जिल्हा न्यायाधीशपदी प्रथमच महिला न्यायाधीशांची नियुक्ती

नगर जिल्हा न्यायाधीशपदी प्रथमच महिला न्यायाधीशांची नियुक्ती

अहमदनगर, (प्रतिनिधी) – अहमदनगरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी प्रथमच महिला न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर येरालगड्डा यांची अमरावती येथे बदली झाली. त्यांच्या जागी धाराशिव (उस्मानाबाद) येथून अंजू. एस. शेंडे यांची बदली झाली आहे.

नगरच्या दोनशे वर्षांच्या जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी महिलेची नियुक्ती झाली आहे. न्यायाधीश शेंडे १८ सप्टेंबरनंतर सूत्रे स्वीकारतील. तसेच त्या शिर्डीच्या साईबाबा संस्थांनाच्या विश्वस्त समितीच्याही अध्यक्ष असतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!