Homeनगर जिल्हामराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी यांची नियुक्ती

मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी यांची नियुक्ती

अहमदनगर,दि.१४ जानेवारी,(प्रतिनिधी) – मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार परिषदेच्या नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली आहे. संदीप कुलकर्णी यांनी तरुण भारत, हिंदुस्तान समाचार, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स सारख्या दैनिकात तसेच अहमदनगर येथील आय लव्ह नगर या डिजीटल प्लॅटफॉर्मला काम केले आहे.

पत्रकारिता क्षेत्रात ते जवळपास 12 वर्षांपेक्षा कार्यरत आहे. शोध पत्रकारितेसाठी त्यांना अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारा थोर समाजसेवक पत्रकार हाजी अजीजभाई चष्मावाला शोध पत्रकारिता पुरस्कारासह विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे. सोशल मीडियात ते सक्रिय असतात.
थेट प्रहार हा त्यांचा ब्लॉग प्रसिद्ध आहे. परिषदेसोबत ते बर्‍याच काळापासून जोडलेले असून विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्याकडे परिषदेची नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, राज्य संपर्क प्रमुख अनिल महाजन यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनी निवडीला मान्यता देत अभिनंदन केले आहे.


दरम्यान, यापूर्वीच परिषदेच्या नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी अमोल वैद्य यांची तर दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी कार्यकारिणी जाहीर करून कामालाही सुरवात केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!