अहमदनगर, दि.२९ एप्रिल,(प्रतिनिधी) – येत्या 4 मे रोजी अनामप्रेम संस्थेत लग्न जुळलेल्या दिव्यागांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. अनामप्रेम संस्थेच्या निंबळक ता.जि. अहमदनगर येथील सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प येथे हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. नगर जिल्ह्यातील विवाह जुळलेल्या दिव्यांग जोडपे यांनी नोंदणी साठी अनामप्रेम संस्था, गांधी मैदान, अहमदनगर येथे पालकांसोबत संपर्क साधावा, असे आवाहन अनामप्रेम संस्थेचे डॉ.बापूसाहेब एकनाथ कांडेकर, इंजि. अजित माने, डॉ.मेघना मराठे, अभय रायकवाड, राधा मिलिंद कुलकर्णी, जे.आर.मंत्री, विष्णू वारकरी, विक्रम प्रभू यांनी केले आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना संसार उपयोगी वस्तू, हॉल, भोजन आदी मदत संस्थेद्वारा मिळणार आहे. सध्या 3 जोडप्याने संस्थेत विवाहासाठी नोंदणी केली आहे. येत्या गुरुवार दिनांक 4 मे 2023 रोजी दुपारी 12:15 वाजता हा विवाह सोहळा, सत्यमेव जयते ग्राम, रवीनंदा संकुल, निंबळक गाव, ता.जि. अहमदनगर येथे आयोजित केला आहे.
कन्यादान करण्यासाठी दान-दात्यांना आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीकृत व नोंदणी करणाऱ्या दिव्यांग जोडप्यांच्या विवाह कार्यक्रमात वधू च्या कन्यादानासाठी देणगीदार यांना संस्थे तर्फे कन्यादान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. याविवाह सोहळ्यासाठी भोजन,इतर खर्च आदी साठी शक्य ती मदत दात्यांना करता येणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ.मेघना मराठे: 9422054956, उद्योजक अभय रायकवाड:7350013806 यांच्याशी संपर्क साधावा.