दिनांक ४ जानेवारीपासुन सुरुवात
अहमदनगर,दि.१५ डिसेंबर,(प्रतिनिधी) – येत्या दि.४ जानेवारी रोजी अनामप्रेम, अहमदनगर संस्थेच्या वतीने अंध – अपंग , अस्थिव्यंग – मूकबधिर विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्याकरिता मैदानी व बौद्धिक स्पर्धा महोत्सवाचे आयोजन अहमदनगर येथे करण्यात आले आहे. राज्यस्तरीय असणाऱ्या या स्पर्धा ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जयंती दिनी हा स्पर्धा महोत्सव होत आहे. येत्या 4 जानेवारी रोजी होत असणाऱ्या या स्पर्धा दोन दिवसीय चालणार आहेत.
या स्पर्धा मैदानी व बौद्धिक स्वरूपाच्या असणार आहेत. वय 8 वर्ष ते 30 वर्षे वयोगटासाठी या स्पर्धा असणार आहेत. मैदानी स्पर्धे मध्ये क्रिकेट (अंध गट), 200 मीटर धावणे (अंध गट), लांब उडी (मूकबधिर गट), व्हीलचेअर रेस (अस्थिव्यंग गट) असणार आहेत. बौद्धिक स्पर्धे मध्ये बुद्धिबळ (अंध गट), चित्रकला (मूकबधिर गट), ब्रेल वाचन (अंध गट) प्रश्न मंजुषा (अंध व अस्थिव्यंग गट) असणार आहेत. इयत्ता 3 री ते पद्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अंध – अपंग – मूकबधिर – अस्थिव्यंग मुला – मुलींना या स्पर्धा मध्ये भाग घेता येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे अनामप्रेम देणार आहे.
या स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScIx5GasqI04kqYx19GNPx_uJaXTKqQUCaFEApTtkizJbLinQ/viewform?usp=sf_link या लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या शाळा व महाविद्यालये येणार आहेत त्यांनी अनामप्रेम शी संपर्क साधावा. या स्पर्धा महोत्सवात सहभागी होणाऱ्या दिव्यागांसाठी निवासी साठी गरम कपडे व पांघरून सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच मौल्यवान वस्तू सोबत आणू नये, स्पर्धा स्थळी पोहचण्याचा प्रवास खर्च स्वतः करणे आहे, स्पर्धकांना व्यसन करण्यास सक्त मनाई आहे, अशा स्पर्धेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. व्यवस्थापक व स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धकांशी गैर वर्तन केल्याचे आढळून आल्यास स्पर्धेतून बाद करण्यात येईल. स्पर्धेविषयी ऐनवेळी नियम अचानक निर्णय घेण्याचा अधिकार आयोजकांकडे असणार आहेत. एका स्पर्धकास केवळ तीन स्पर्धेमध्ये भाग घेता येणार आहेत असे नियम या स्पर्धेसाठी असणार आहेत.
अधिक माहितीसाठी प्रतीक्षा मुंत्तोडे – 9970462674, अमृत भुसारी – 7350013847, विलास शिंदे – 9011918786, विशाल निंबाळकर – 9561604378 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अनामप्रेम संस्थेचे अजित माने, डॉ.बापूसाहेब कांडेकर, दीपक बुरम, जे.आर.मंत्री, डॉ.मेघना मराठे, अभय रायकवाड, डॉ.प्रकाश शेठ, डॉ.सायली सोमण, उमेश पंडुरे, रामेश्वर फटांगडे, संभाजी खिलारी, विष्णू वारकरी, अजित कुलकर्णी यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात केले आहे.