मुंबई,दि.१२ एप्रिल,(ऑनलाईन वृत्त) –
म्यानमारमध्ये लष्कराने एका गावावर हवाई हल्ला केला आहे. पत्रकारांसह एकूण १०० व्यक्तींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
म्यानमारमधील एका गावात पिपल्स डिफेन्स फोर्स कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.
त्यावेळी लष्कराकडून या ठिकाणी बॉम्ब टाकण्यात आला आहे. यावेळी बॉम्ब हल्ल्यात १०० व्यक्तींचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये सरकारविरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सामान्य महिला नागरिक आणि २०-३० लहान मुलांचा समावेश आहे.
दरम्यान, म्यानमार सरकारने या हवाई हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच या हल्ल्याचे येथील सरकारने वार्तांकन करण्यास मनाई केल्याने या हल्ल्यात नेमके किती लोक मृत्यूमुखी पडले आहेत याचा निश्चित आकडा समोर आलेला नाही.
म्यानमारमध्ये लष्कराकडून हवाई हल्ला; पत्रकारांसह १०० जणांचा मृत्यू
Recent Comments
Hello world!
on