नवी दिल्ली, ६ मे २०२३ ( ऑनलाईन वृत्त) – चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. देशभरातून भाविक यात्रेसाठी निघाले आहेत. बद्रीनाथ, केदारनाथ मंदिराची कवाडे उघडल्यावर या यात्रेला प्रारंभ झाला आहे. यात्रेदरम्यान असाच एक मोठा नैसर्गिक अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात भाविक बचावले आहे.
बद्रीनाथ महामार्गावर असणारे हेलंग पर्वतापाशी भूस्खलन झाल्यामुळं आता हा रस्ता बंद झाला आहे. वाहनांच्या रांगा उभ्या असतानाच तिथं एकाएकी एक आवाज झाला, शांततेला भेदणाऱ्या या आवाजापाठोपाठच डोंगराचा मोठा तुकडा, माती सारंकाही रस्त्यावर कोसळले आहे. ही दृश्य पाहून तिथं असणाऱ्या यात्रेकरूंनाही धडकी भरली आणि त्यांनी किंकाळ्या फोडण्यास सुरुवात केली.
काहींनी तिथून जीव मुठीत घेऊन पळ काढला. सदर घटनेनंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, भाविक मात्र मध्येच अडकून पडले असल्यामुळं प्रशानंनाही त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.या घटनेनंतर चारधाम यात्रा थांबवण्यात आली आहे. बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना अडवण्यात आले आहे. महामार्गावर भूस्खलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. महामार्ग बंद झाल्यानंतर अनेक ठिकाणी वाहतुक ठप्प झाली आहे. हजारो प्रवासी मार्गात अडकून पडले आहेत.
ढिगाऱ्याखाली सापडल्याने कारमधून प्रवास करणारे चंदीगड येथील दोन प्रवासी जखमी झाले. त्याचवेळी हनुमान चाटी येथे डोंगरावरून दगड पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा… निसर्गाचा कोप
Recent Comments
Hello world!
on