मुंबई, २३ जानेवारी २०२३
शिवसेना ठाकरे गट आणि आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण पाहायाला मिळणार आहे. या नव्या युतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मुंबईतील काळा घोडा येथील पुतळ्यास पुष्पहार आणि अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहे. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि आणि वंचित बहुजन आघाडीच्या नव्या युतीवर भाष्य केले आहे. ‘भीम शक्ती आणि शिव शक्ती एकत्र, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना देखील शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेबांनी नेहमीच सर्वांना न्याय दिला. हे सरकार बाळासाहेबांच्या विचारावर आधारीत आहे. हे जनसामान्यांचं सरकार आहे’.