अमरावती,दि.११ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – आमदार तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसत असताना भरधाव दुचाकीने त्यांना उडवले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याने अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात बुधवारी (११ जानेवारी) सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे एका कार्यक्रमाला जाण्याकरिता अमरावतीत आले होते. कठोरा नाक्यावरील आराधना चौकात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्याकरिता ते जात होते. दरम्यान भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावरील दुभाजकावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच पायाला मार लागल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.
अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना बच्चू कडू यांना अपघात झाला. एका दुचाकीस्वाराने कडूंना धडक दिली. धडकेत बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
सकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान बच्चू कडू नेहमीप्रमाणे घराबाहेर निघाले होते. अमरावती शहरातील कठोरा रोड परीसरात ते चालत असताना अचानक एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. थंडी व मंद असा अंधार असल्याने काही काळाच्या आत बच्चू कडू खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. अमरावती शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आपली प्रकृती ठीक असून कार्यकर्त्यांनी संयम राखावा अशी आवाहन प्रहार न केले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात राज्यातील आमदारांना अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी भाजप आमदार जयकुमार गोरे कार अपघातात भीषण जखमी झाले, तर गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनाही कार अपघातात मोठी दुखापत झाली.