Homeदेश-विदेशदेवदर्शनाला जाणाऱ्या भरधाव ट्रकचा अपघात, आठ भाविकांचा मृत्यू

देवदर्शनाला जाणाऱ्या भरधाव ट्रकचा अपघात, आठ भाविकांचा मृत्यू


पंजाब,दि.१४ एप्रिल,(ऑनलाईन वृत्त)

पंजाबमधील गडशंकर येथे काल अपघात झाला भरधाव ट्रकने 8 भाविकांना चिरडले आहे. अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. बुधवारी रात्री उशिरा सुमारे 50 भाविक बैसाखी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी चालले होते.

या अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पाच भाविक एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृत भाविक उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील आहे.

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे बुधवारीच पंजाबमधील गडशंकर भागातील गढ़ी मानोस्वालजवळ ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर 10 जण जखमी झाले होते. गडशंकर उपविभागातील श्री खुरालगड साहिब येथे बैसाखीनिमित्त लंगरचे आयोजन करण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे.

गंधाशंकरच्या रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे रस्ते अपघातात वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!