Homeनगर शहरपोस्को कायद्यावर भाष्य करणारा 'अभया' नाट्य प्रयोग संपन्न

पोस्को कायद्यावर भाष्य करणारा ‘अभया’ नाट्य प्रयोग संपन्न

अहमदनगर,दि.२८ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्को कायदावर भाष्य करणारा ‘अभया’ हा एकअंकी नाट्य प्रयोग सीएसआरडी सभागृह येथे संपन्नझाला. सह प्रायोजक म्हणुन शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन अहमदनगर, इनरव्हील क्लब अहमदनगर, व्हिनस क्लब अहमदनगर, सुसंवाद ग्रुप अहमदनगर व रोटरियन प्रतिभा धूत यांचा सहयोग लाभला. मुंबई येथील कळसूत्री निर्मित व सुप्रसिध्द लेखिका, दिग्दर्शिका मीना नाईक यांची संकल्पना असलेले अभया या एकपात्री नाटकामध्ये टीव्ही मालिकांमध्ये नाविन्यपूर्ण काम करत असलेली कलाकार चिन्मयी स्वामी यांनी भूमिका केली तर पार्श्वसंगीत व नेपथ्य निलेश बोडले यांचे होते. बाल लैंगिक अत्याचार व पोस्को कायदा यांचा आढावा घेणाऱ्या ‘अभया’  या एकअंकी  नाट्य प्रयोगास विद्यार्थ्यांचा उस्पुर्त प्रतिसाद लाभला.

समाजकार्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सदर नाट्य प्रयोगास मोठ्या संख्येने हजेरी लावत प्रयोगानंतर झालेल्या चर्चासत्रात आपली मते मांडत सहभाग नोंदविला. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या अध्यक्षा ॲड नीलमणी गांधी, पीपी कुंदा हळबे, पीपी वैशाली कोलते, शंतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन अहमदनगरच्या सौ. रिंकू फिरोदिया, सौ. कटारिया व इतर सदस्य हजर होते तसेच सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे म्हणाले कि, बाल लैंगिक अत्याचार हा आपल्या समाजातील सद्यस्थितीतील महत्त्वपूर्ण प्रश्न बनत चालला आहे. अनेक निरागस मुले – मुली या अत्याचारास बळी पडत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा समजून घेण्यासाठी अश्या स्वरूपाचे नाट्य प्रयोग होणे आवश्यक आहे. समाजकार्यकर्त्यांनी या कायदा समजून घेवून त्याच्या जाणीव जागृतीसाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या मनोगतात रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या अध्यक्षा ॲड नीलमणी गांधी यांनी बालकांच्या सद्यस्थितीतील समस्यांचा आढावा घेत बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रश्नांवर भाष्य केले. बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या विविध यंत्रणाची माहिती करून दिली.

कळसूत्री मुंबई येथील कलाकारांनी सादर केलेल्या “अभया”  या नाट्य प्रयोगात बाल लैगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये पिडीत बालिकेच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कलाकार चिन्मयी स्वामी यांनी अतिशय चांगल्या अभिनयाच्या माध्यमातून अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर पिडीत बालिकेला कोणकोणते अनुभव येतात तसेच विविध यंत्रणा पोस्को कायदा अंमलबजावणीमध्ये कश्या आपल्या भूमिका बजावतात तसेच समाजकार्यकर्त्या म्हणून आपण पिडीतेला कश्या स्वरुपात सहाय्य केले पाहिजे यांची उत्कृष्टरित्या मांडणी केली. विद्यार्थ्यांनी सदर नाट्य प्रयोग झाल्यानंतर चर्चासत्राच्या माध्यमातून बाल अत्याचाराचे प्रश्न कसे हाताळावे व समाजकार्यकर्ता म्हणून कोणती जबादारी निभवावी यावर आपली मते अभिप्रायाच्या माध्यमातून मांडली.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!