Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! संजय राऊत यांच्यावर नाशकात गुन्हा दाखल

मोठी बातमी! संजय राऊत यांच्यावर नाशकात गुन्हा दाखल



मुंबई, १४ मे २०२३ – खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सातत्याने आपल्या भाषणातून विरोधकांवर खरमरीत टीका करतात. प्रत्येकाला ते आपल्या शैलीत उत्तरे देतात. अशात राज्य सरकारविरोधात केलेलं एक वक्तव्य खासदार संजय राऊतांना चांगलच महागात पडले आहे. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असे वक्तव्य त्यांनी केले होते. काही दिवसांआधीच सत्ता संघर्षावर सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. यावर सर्वच नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहे. तसेच शिंदे ठाकरे असे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. संजय राऊतांनी सरकारविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सरकार अपात्र आमदारांच्या भरवशावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे जनतेने घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलेल्या सरकारच्या नियमांचे पालन करू नये, असं आवाहन संजय राऊतांनी केलं होते. त्यामुळे या वक्तव्यावरून संजय राऊतांवर कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!