Homeनगर शहरनगर शहरात रंगणार ब्रायडल टॅलेंट शो

नगर शहरात रंगणार ब्रायडल टॅलेंट शो

युवतींसाठी नैसर्गिक पद्धतीने सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन

अहमदनगर,दि.१६ मे,(प्रतिनिधी) – शहरात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. 30 मे रोजी अहिल्या मेकओव्हर अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूट आणि अहिल्या फाऊंडेशन प्रस्तुत ब्रायडल टॅलेंट शो चे आयोजन करण्यात आले आहे. तर युवतींसाठी नैसर्गिक पद्धतीने सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठी मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा कावेरी कैदके यांनी दिली.

सावेडी येथील माऊली सभागृहात होणार्‍या या कार्यक्रमात युवती ब्रायडल लुक मध्ये रॅम्प वॉक करून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. यामधील विजेत्यांना आकर्षक बक्षीस व सर्व मॉडेल्सना भेट वस्तू प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हाने सन्मानित केले जाणार आहे.
तसेच युवतींना निसर्गोपचार तज्ञ डॉ. हेमा सेलोत नैसर्गिक पध्दतीने सौंदर्य जपण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. या ब्रायडल टॅलेंट शो मध्ये सहभागी होण्यासाठी 9096230646 या नंबरवर संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!