Homeनगर शहरशहरात रंगला ब्रायडल टॅलेंट शो, पारंपारिक ब्रायडल लुक मध्ये युवतींचा रॅम्प वॉक

शहरात रंगला ब्रायडल टॅलेंट शो, पारंपारिक ब्रायडल लुक मध्ये युवतींचा रॅम्प वॉक

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्या फाउंडेशनचा उपक्रम

अहमदनगर,दि.७ जुन,(प्रतिनिधी) – शहरात झालेल्या ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक वधूंच्या वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. अहिल्या फाउंडेशन व अहिल्या मेकओव्हर अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूटच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त माऊली सभागृहात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास युवतींसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  
या कार्यक्रमासाठी निसर्गोपचार तज्ञ डॉ. हेमा सेलोत, योग प्रशिक्षिका रिद्धी चंदे, संस्थेच्या अध्यक्षा कावेरी कैदके, उपाध्यक्ष केतन ढवण, सचिव सुवर्णा कैदके, सदस्य पंढरीनाथ ढवण, निलेश ढवण, वैशाली शिपणकर आदींसह युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नैसर्गिक पद्धतीने सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठी झालेल्या व्याख्यानात निसर्गोपचार तज्ञ डॉ. हेमा सेलोत म्हणाल्या की, शारिरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी निसर्गोपचार हे एक वरदान असून, याच्या योग्य वापराने निरोगी जीवन जगता येते. दैनंदिन प्राणायाम, योगा व सकस आहार घेऊन प्रतिकार शक्ती वाढविण्याचा सल्ला त्यांनी दिला. कृत्रिमपणे सौंदर्य न खुलविता निसर्गोपचाराने कायमचे सौंदर्य खुलविण्यासाठी त्यांनी घरगुती नैसर्गिक उपाय सांगितले.

प्रारंभी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या टॅलेंट शोमध्ये युवती ब्रायडल लुक मध्ये रॅम्प वॉक करून विविध कलागुण सादर केले. यामध्ये शोभा कोल्हे, नीता दरंदले, स्वाती उंडे, प्रेरणा महाजन, गौरी लांडे, अर्चना वाघ, भारती अस्वार, वैष्णवी भुसे, मयुरी जठार, नम्रता शेळके, सिद्धांत भागवत, गीताश्री व्यवहारे, अर्चना दळवी, प्रियंका शिंदे, अरसीन शेख, मनीषा त्र्यंबके, साक्षी पवार, निर्मला सोनवणे, योगिता बागडे, अद्विका शेळके आदींनी सहभाग घेतला होता. यामधील विजेत्यांना आकर्षक बक्षीस व सर्व मॉडेल्सना भेट वस्तू प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजल परमार यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!